तालुकाध्यक्ष पदी शेख आरीफ तर सचिवपदी मोहियोदीन शेख यांची बिनविरोध निवड
नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार)
ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ या सामाजिक संघटनेची नायगाव तालुका व शहर कार्यकारिणी इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात एक बैठक घेऊन करण्यात आली आहे यामध्ये तालुकाध्यक्षपदी शेख आरीफ,तालुका सचिवपदी शेख मोहियोदीन सर तर उपाध्यक्षपदी शेख आजम,नायगाव शहराध्यक्षपदी शेख अजीज व नरसी प्रभारी पदी सद्दाम पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्साफ चे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इन्साफचे जिल्हा उपाध्यक्ष जुबैर खान,मोईन कुरेशी,आमेर अरसिल,नांदेड शहराध्यक्ष शाहेद उल इस्लाम,जिल्हा सो मिडिया अध्यक्ष मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर,देगलूर तालुका प्रभारी असलम शेख यांची उपस्थिती होती अध्यक्षीय भाषणात अ.बशीर माजीद यांनी संघटने बद्दल ची सविस्तर माहिती सांगून गेल्या नऊ वर्षापासून ही सामाजिक संघटना सक्रिय असून प्रत्येकांना येणाऱ्या अडचणी व समस्यांना सामोरे जावून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी सदर संघटना काम करत आहे तसेच प्रशासनाचे जनजागृतीचे आव्हान सुध्दा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम संघटना करत असल्याचे ते म्हणाले यावेळी इतर पदाधिकार्यांचेही समयोचित भाषणे झाली त्यानंतर इन्साफ च्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार शेख आरीफ रसुलसाब, तालुका सचिवपदी शेख मोहियोदीन सर, तालुका उपाध्यक्ष शेख आजम, नायगाव शहराध्यक्षपदी शेख अजीज आणि नरसी प्रभारीपदी सद्दाम पटेल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली या सर्वांना मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अ.बशीर माजीद यांच्या हस्ते निवडिचे नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शादुल भाई कुंचेलीकर,रफिक पठाण,शेख सत्तार भाई,बाबाभाई,पत्रकार अहेमद भाई,शेख आसीफ,शेख लतीफ,मो.गौस,शेख फेरोज,जीलानी इमामसाब,अ.वाहेद,शेख फाजील,जकी पठाण,शेख वाहेद,अ.साजीद,मुद्दसीर,आफताब,आलताफ प्रास्ताविक पत्रकार शेख अजिम नरसीकर तर आभार असलमभाई यांनी मानले

COMMENTS