नांदेड. (प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील संभाजी चौक भागातील रहिवासी तथा हडको परिसरातील विद्यानिकेतन हायस्कूलच्या सेवानिवृत्त...
नांदेड. (प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील संभाजी चौक भागातील रहिवासी तथा हडको परिसरातील विद्यानिकेतन हायस्कूलच्या सेवानिवृत्त सेविका कौशल्याबाई धोंडीबा पांचाळ (वय-६२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने ११ जून रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर १२ जून रोजी नवीन नांदेड भागातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दैवशालाताई पांचाळ यांच्या 'त्या' सासू तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव पांचाळ यांच्या 'त्या' मातोश्री होत.

COMMENTS