२ लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू व सासर्‍यांविरूध्द गुन्हा

नांदेड. (विशेष प्रतिनिधी) ट्रॅक्टर घेण्यासाठी तुझ्या माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये, म्हणून एका २४ वर्षीय विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याच...


नांदेड. (विशेष प्रतिनिधी) ट्रॅक्टर घेण्यासाठी तुझ्या माहेराहून २ लाख रुपये घेऊन ये, म्हणून एका २४ वर्षीय विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात अखेर पतीसह सासू व सासऱ्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, लादगा (ता. मुखेड) येथील रहिवासी तहसिन बेगम अब्दुल रज्जाक या विवाहितेस तिचा पती अब्दुल रज्जाक शेख वली आजम, सासू शरीफा बेगम शेख वली आजम व सासरा शेख वली आजम यांनी गेल्या ४ ते ५ वर्षापासून ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपये घेवून ये, म्हणून तगादा लावला. विवाहितेकडून आपली पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचे लक्षात येताच उपरोल्लेखित आरोपींनी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपी हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपणास उपाशी पोटी ठेवून सासरी व माहेरी शिविगाळ करून जिवे मारण्याचीही धमकी दिली आहे, असा आरोप विवाहिता तहसिन बेगम (रा. एकबालनगर, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीतच नमूद केले असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार तथा सहायक पोउपनि. डी. एन. मोरे व मदतनीस महिला पो. कॉ. पूनम उदगिरे यांनी दिली आहे.

याप्रकरणी तहसिनबेगम अब्दुल रज्जाक यांच्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपरोल्लेखित आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बालाजी चंचलवाड व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel