सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ शहरातील दलीत वसाहतीत असणाऱ्या स्वतंत्र फिडरला दुसरा भाग जोडून दलीत वसाहतीत विद्युत पुरवठा खंडीत करण्याचे षडयंत्र रचणाऱ्या सोनपेठच्या अभियंत्यासह महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारोती रंजवे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे.की,सोनपेठमध्ये कार्यरत असणारे महावितरणचे अभियंता तथा इतर कर्मचारी हे दलीत द्वेष ठेऊन त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.यात या महावितरणच्या यंत्रणेकडून दलीत वसाहतीत सक्तीची वीजबिल वसुली करणे दलीत वसाहतीत असणाऱ्या फिडरचा वारंवार विद्युत पुरवठा खंडीत करुन चालू फिडर असताना नादुरुस्त फिडर दाखवणे,नादुरुस्त फिडरला दुरुस्त करण्यास विलंब लावणे असे प्रकार नेहमी जाणून-बुजून करण्यात येत असून यात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करुन सोनपेठच्या दलीतांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते मारोती रंजवे,पत्रकार सिद्धेश्वर गिरी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS