परभणी/प्रतिनिधी परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज फुकट मिळत नाही त्यासाठी कोळसा विकत घ्यावा लागतो तो घेण्यासाठी...
परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज फुकट मिळत नाही त्यासाठी कोळसा विकत घ्यावा लागतो तो घेण्यासाठी सक्तीची बिलवसूली हाच पर्याय असल्याचे नितीन राऊत यांनी स्पष्ट करत पत्रकार परिषदेतुन काढता पाय घेतला.मी विदर्भातील असलो तरी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित करणारा असल्याचेही यावेळी स्पष्ट करत सौरऊर्जा हा ऊर्जेसाठी पर्याय असला तरी कोरोनाच्या काळात प्रस्ताव सादर करण्यास होणाऱ्या अडचणीमुळे यात काम करणाऱ्या यंत्रणांची क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
*वीज देण्यासाठी वसुली हाच पर्याय:-ना. नितीन राऊत*परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्हा दौऱ्यावर असणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वीज फुकट मिळत नाही त्यासाठी कोळसा विकत घ्यावा लागतो तो घेण्यासाठी सक्तीची वीज बिलवसूली हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करत पत्रकार परिषदेतुन काढता पाय घेतला.पत्रकारांनी वीजबिल भरूनही विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांनी हे वक्तव्य केले.यावेळी विदर्भातील असलो तरी मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित करणारा असल्याचे सांगत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेऊन परभणी आणि बीड जिल्ह्याला प्राधान्य देऊन दिल्याचे स्पष्ट करत सौरऊर्जा हा ऊर्जेसाठी पर्याय असला तरी कोरोनाच्या काळात प्रस्ताव सादर करण्यास होणाऱ्या अडचणीमुळे यात काम करणाऱ्या यंत्रणांची क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS