माहूर (प्रतिनिधी )माहूर शहरा पासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या पाचुंदा या गावात नव्यानेच झालेले मागासवर्गीय वस्तीतील सी.सी.रोड व नाली बांधकाम अंदाज पत्रकातील प्रावधाना नुसार करण्यात आले नाही.तसेच करण्यात आलेले काम अतिशय दर्जाहीन होऊनही उप अभियंता किनवट यांनी पदाधिका-यांच्या दबावाखाली येऊन आठ लक्ष रुपयाचा निधी वितरित केल्याचा आरोप करून दोन्ही कामाची त्री सदस्यी समिती मार्फत चौकशी करून सर्व संबंधीतांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण ) दत्तराव लालू मोहिते यांनी दि.3 जून रोजी जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
मोहिते यांनी केलेल्या तक्रारीत माहूर तालुक्यातील वानोळा व वाई बाजार या जि.प.गटात मागासवर्गीय वस्तीतील कामासह 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेली व सुरू असलेली कामे अतिशय दर्जाहीन असल्याचे वास्तव कथन केले आहे.याव्यतिरिक्त त्यांनी दि.4 जून रोजी माहूर पं.स.चे गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे यांना दिलेल्या तक्रारीत मुंगशी ग्रामपंचायत अंतर्गत मुंगशी व रामपूर शिवारात करण्यात आलेली शेततळे,एल.बी.एस.व सार्वजनिक विहिर आदि मनरेगाची कामे मजुरा ऐवजी जे.सी.बी.मशीनने केल्याचे बिंग फोडल्याने तालुक्यातील ईतर कामाचीही चौकशी होणार का ?याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS