नांदेड. (विशेष प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन आणि राष्ट्रवादीचे नेते विलास गजभारे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडच्या सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना पावसाळ्यात वृत्तपत्र भिजु नयेत, म्हणून ताडपत्री व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून 'राकाँ' च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १० जून रोजी मास्कचेही वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिन तसेच राष्ट्रवादीचे नेते विलास गजभारे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत नवीन नांदेड भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना ताडपत्री व मास्क वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष दासराव पुयड, राष्ट्रवादीचे (दक्षिण) विधानसभा अध्यक्ष खलील नवाद, के.एल. ढाकणीकर, राजुभाऊ लांडगे, प्रदीप लोणे, जगदीश भुरे, राजू निखाते, भिमराव सोनकांबळे, अनिल जोंधळे, विष्णू सुर्यवंशी, नविन नांदेड परिसरातील मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांचेसह वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम आणि त्यांचे सहकारी पदाधिकारी दिलीप ठाकूर व बालाजी सुताडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास जेष्ठ विक्रेते रामनाथ दमकोंडवार, शेख सयदोद्दीन, मदनसिंह चौहाण व बालाजी दमकोडंवार यांचेसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थितीत होते.
दरम्यान, सिडको परिसरातील भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते व वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते विलास गजभारे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

COMMENTS