धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील येवती हे गाव विमा
शाळा एलआयसी म्हणून लवकरच होणार तेव्हा परत एक येवती या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा नक्कीच लागेल आसे प्रतिपादन ब्रँच मॅनेजर पांडुरंग भातलवंडे यांनी म्हणाले.
या गावाला 5 वर्षा पूर्वी धर्माबाद तालुक्यात प्रथम डिजिटल जिल्हा परिषद शाळा झाल्याचा बहुमान मिळाला आसुन याचे सर्व श्रेय जातंय ते शाळेतील शिक्षक वृंद आणी त्यांना वारंवार प्रोत्साहन देणारे मुख्यध्यापक सर यांना तसेच पोषण आहार समितीला
प्रत्येक गोष्टी सातत्य ठेऊन उत्कृष्ट कार्य केल्यामुळे एक येवती गाव च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला हे अभिमानाने सांगावं वाटत.
परत कार्य करत असताना धर्माबाद येथील lic ऑफिस मध्ये असे निदर्शनास आले की ब्रँच मॅनेजर पांडुरंग भातलवंडे, विकास अधिकारी कु गीतांजली पाळेकर यांनी एक संकल्पना मांडली की या गावांमध्ये खूप कमी प्रमाणात पॉलिसी धारक आहेत.
विमा प्रतिनिधी नीता ठाकर व विद्या घुमडे यांनी विमा शाळा व ग्राम विमा करण्यासाठी तयारी दर्शविली. तर मग झाले असे की आर्थिक वर्षे 31 मार्च 2021 या वर्ष्यात विमा शाळा साठी जे निकष आसतात ते गावातील सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केलेले आहेत.
आता lic लवकर च येवती हे गाव विमा शाळा झाले असे सुचवेल.
तेव्हा परत एक येवती या गावच्या शिरपेचात मानाचा तुरा नक्कीच लागेल.
हे सर्व करत असताना गावचे प्रतिष्ठित भोसले साहेब,
मुख्याध्यापक शिवकुमार पाटील आणि शिक्षक वृंद यांचे वारंवार सहकार्य लाभले.

COMMENTS