सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी
सद्या स्थितीत सुरू असणाऱ्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या निमित्ताने घरी असणाऱ्या पुरुषाचे घरातील महिलांसोबत साध्या कारणाने वाद होऊन या वादाचे रूपांतर आत्महत्यासारख्या निर्णयात होत असल्याची घटना विटा(बु.)येथे घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की सोनपेठ तालुक्यातील खपाट पिंपरी येथील एक विवाहीत महिला तीच्या सवतेने आणि नवऱ्याने यासह सासरच्या काही नातेवाईकांनी त्रास दिल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली होती.यातुन पाथरी तालुक्यातील विटा(बु.)येथील गोदावरी नदीपर्यंत सदर विवाहीत महिलेने येऊन आत्महत्या करत असताना गावातील युवकांनी "त्या"विवाहीत महिलेचे प्राण वाचवून तीचे समुपदेशन करुन वर्गणी गोळा करत खाजगी वाहनाने माहेरी सोडत माणुसकीचा संदेश दिला आहे.मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील कोंडीबा जडे यांची असणारी मुलगी तीचा खपाट पिंपरी येथील युवकासोबत विवाह झाला होता.यातून जन्मलेल्या मुलीला दीड वर्ष झाले आहे.मात्र मुलीने सांगितल्याप्रमाणे नवरा आणि सवथ यांच्याकडून छळ करण्यात येत असल्याने जीवनाला कंटाळून ८ किलोमीटर पायी येऊन तीने त्या चिमुकल्या मुलीसह आत्महत्येचा पर्याय निवडला होता.सध्या कोरोना आजारामुळे कोणी कोणाला बोलायला तयार नसल्याचे चित्र समाजात एकीकडे दिसते तर दुसरीकडे मात्र विटा येथील युवकांनी तीचे प्राण वाचवत तीचे समुपदेशन करुन आत्महत्या हा जीवनातला पर्याय नसल्याचे सांगून तीचे विचार परावर्तित केले आहेत.यात माऊली राजे आरबाड,दत्ता देंडगे,संदीपान खुळे,विनायक आरबाड,उपसरपंच महादेव हारकाळ,वाल्मिक आरबाड,कैलास आरबाड,अवधूत गिरी,सचिन हारकाळ,बाळू ढेंबरे,बाळू दळवे,यांच्यासह गावातील युवकांनी दोन जीव वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS