एसटी महामंडळाचे धोरण माजलगावात महामारी वाढण्यास ठरणार कारणीभुत.
माजलगाव प्रतिनिधी
दोन आठवड्यापूर्वी बेस्टच्या ड्युटी साठी माजलगाव बसस्थानकातील 22 चालक वाहक पाठवले होते. परवा माजलगावात आल्यानंतर त्या वाहक चालकांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला. परंतु तो अहवाल आणखी प्रतीक्षेत असताना डेपो मॅनेजरने त्या वाहक चालकांना कर्तव्यावर जाण्याची सक्ती केली आहे.एसटी महामंडळाचे हे धोरण माजलगावात कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसते.
माजलगाव एसटी महामंडळाचे ड्रायव्हर, कंडक्टर यांना मुंबईतल्या बेस्ट बस चालवण्यासाठी 10 एप्रिल रोजी पाठवले होते.दरम्यान त्या ठिकाणी कर्तव्य पार पडल्यानंतर मुंबई वरून आल्यावर कोरोनाची RTPCR टेस्ट करण्यासाठी पाठवले होते.परंतु त्यांचा रिपोर्ट आला नाही.तो आज मंगळवारी दुपारनंतर येणार आहे आहे.रिपोर्ट न येताच त्यांना शिवशाही बसच्या प्रशिक्षणासाठी बसवर दिवट्या लावल्या आहेत.कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता यांना रिपोर्ट येई पर्यंत होम कोरोन्टाईन करणे गरजेचे आहे. परंतु तसे न करता डेपो व्यवस्थापक यांनी त्यांना दिवट्या लावल्या आहेत. मुंबईसारख्या शहरात रुग्णांची वाढती संख्या.आणि त्या ठिकाणी कर्तव्य करून आलेल्या त्या 22 वाहक चालकांचा दोन आठवडे त्याठिकाणी झालेला वावर दुर्दैवाने त्यामधील अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह निघू शकतात.दरम्यान आज सकाळपासून शिवशाही प्रशिक्षणासाठी त्या बावीस वाहक चालकासोबत इतर 16 वाहक चालक प्रशिक्षणासाठी जात आहेत. सदरील त्या बावीस चालक-वाह काच्या कोरोना अहवालाची प्रतीक्षा न पाहता माजलगाव डेपोचा
कारभार महामारी वाढण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येते.
त्या 22 चालक-वाहकांचा रिपोर्ट निगेटिव्हच!
बेस्टची मुंबईवरून ड्युटी करून आलेल्या त्या 22 वाहनचालकांचा rtpcr कोरोना अहवाल अद्याप हातात पडला नाही.परंतु आम्ही कोव्हीड सेंटर वरून माहिती घेतली आहे. तो पाठवलेला आव्हाल निगेटिवच असल्याचे समजल्याने आम्ही त्या 22 वाहक चालकांना शिवशाही प्रशिक्षणासाठी पाठवले असल्याचे थातुरमातुर उत्तर डेपो मॅनेजर काळम पाटील यांनी दिली.

COMMENTS