जि.प. च्या निधी अपहार प्रकरणी ढोरगावच्या सरपंच अपात्र तर ग्रामसेवकाची वेतनवाढ बंद.! - अप्पर आयुक्तांचा निकाल.

      माजलगाव/प्रतिनिधी     ग्रामविकासा साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेतून दिल्या जाणाऱ्या निधी विनियोग कामे पूर्ण ...





      माजलगाव/प्रतिनिधी     ग्रामविकासा साठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेतून दिल्या जाणाऱ्या निधी विनियोग कामे पूर्ण न करताच माजलगाव तालुक्यातील ढोरगाव ग्रा.पं.च्या सरपंच सौ यमुना ग्यानबा सरवदे व तत्कालीन ग्रामसेवक भागवत भुजबळ यांनी संगनमताने निधीचा अपहार केल्याचे सिद्ध झाल्याने बाबासाहेब बेलदार ,अप्पर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांनी प्रकरणातील अपीलाचा निकाल २६ मार्च २०२१रोजी देऊन सरपंच सौ यमुना ग्यानबा सरवदे यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवले आहे तर ग्रामसेवक भागवत भुजबळ यांनी सर्व आरोप मान्य केल्याने त्यांची एकवेतन वाढ कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या अपहार प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत ढोरगाव येथील समाजमंदिरा समोर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी ३३ हजार रुपये, जि.प.शाळे समोरून नालीबांधण्या साठी ४३ हजार ५०० रुपये एवढ्या आगाऊ रक्कमेची उचल २६ जुलै २०१८ रोजी केली होती पण ती कामे पूर्ण न करता व त्याची तांत्रिक मान्यता घेतली नव्हती ती दिडवर्षाने जास्तीचे अंदाज पत्रक तयार करून घेतली होती पण सर्व बीलांची रक्कम अगोदरच उचलली. शाळेसाठी अँनराईड टिव्ही किंमत २२ हजार ६००रु.,शाळेत पाण्याच्या फिल्टर साठी १९ हजार, ६६८रु. अंगणवाडीत फिल्टर साठी २३हजार ,६०२रु. गावातील मच्छर मारण्यासाठी फाँगिंग मशीन खरेदी करीता १९ हजार, ६६८रुपये. एवढ्या रक्कमा एकाच दिवशी म्हणजे ३१ मार्च २०१८ रोजी वेगवेगळ्या धनादेशाद्वारे उचलल्या होत्या पण यातील एकही साधन उपलब्ध करून दिले नव्हते. तसेच जन्म-मृत्यू उताऱ्याच्या अद्यावत नोंदी चे रजिस्टर ठेवले नाहीत.  यासर्व बाबींवर ग्रामपंचायत सदस्य सुखदेव अर्जुन मुळे, छगन दौलतराव सरवदे, यशवंत मारोती सातपुते, दत्ता प्रकाश आबुज सह उपसरपंच शोभा भारत सातपुते यांनी आक्षेप घेत १८ जानेवारी -२०१९ रोजी सरपंचाना अपात्र ठरवून ग्रामसेवकावर कार्यवाही करण्यात यावी म्हणून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार, अपील दाखल केले होते. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, माजलगाव ची चौकशी समिती नेमली. यात सर्व प्रकारच्या बाबतीत अनियमिता व कामांची मोजमाप पुस्तीका, अंदाज पत्रके उपलब्ध करून दिली नाहीत असा अहवाल गटविकास अधिकारी यांनी २९/०३/२०१९रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला होता. यानंतर मु.का.अ.यांनी दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती व त्याचा खुलासा ग्रामसेवकाने दिला होता पण तो समाधान कारक नसल्याने त्याला १० आँक्टोंबर - २०१९ रोजी निलंबित करण्यात आले होते व त्या नंतर बहाल करून एकवर्षाची वेतनवाढ बंद करण्यात आली होती. सरपंचांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ३९(१)नुसार अपात्रतेच्या कार्यवाही साठी प्रकरण ठेवण्यात आले होते व यात बाजू मांडण्यासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ ते २१ जुलै २०२० यादरम्यान सहावेळा सुनावणी ठेवण्यात आली होती पण सरपंच यमुना सरवदे ह्या एकाही तारखेला हजर राहिल्या नाहीत. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ३१ जुलै २०२० रोजीच्या अहवालात नमूद केले होते की, सरपंचा विरूद्ध ग्रामपंचायत अधिनियम१९५८ चे कलम ३९(१) नुसार कार्यवाही करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावा. असा संव्यसष्ट अहवाल सादर केला होता.  याची सुनावणी विभागीय अप्पर आयुक्त, औरंगाबाद यांच्या न्यायालयात झाली आणि त्याचा निकाल २६ मार्च २०२१ रोजी लागला असुन या निकाल पत्रात त्यांनी असे आदेश पारित केले आहेत की, सरपंच पदासाठी यमुना ग्यानबा सरवदे या अनर्ह (अपात्र) ठरण्यात आल्या असुन ग्रामसेवक भागवत भुजबळ यांनी सर्व आरोप मान्य केले असल्याने त्यांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करावी. प्रकरणात अर्जदारांच्या वतीने विधीज्ञ  एम.पी.गंडले यांनी बाजू मांडली तर गैर अर्जदारांच्या वतीने एम.पी.घुमरे यांनी युक्तिवाद केला होता. याची नक्कल ५ एप्रिल रोजी प्राप्त झाली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group