कोरोना बाधिक मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा ----- रयत क्रांतीचे पांडुरंग शिंदे यांची मागणी..

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )  राज्यात वाढता कोरोना कहर लक्षात घेता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांच...


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

 राज्यात वाढता कोरोना कहर लक्षात घेता रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड  जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

 पांडुरंग शिंदे यांनी प्रमुख  मागणी केली की, कोरोना बाधिक कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाला शासनाने ₹ ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी व सरकारी कर्मचाऱ्यां प्रमाणे मेडिक्लेम सर्वसामान्य जनतेचा लागू करावा, कोविड १९ आजाराच्या उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जो खर्च झाला तो सरकारने द्यावा कारण  वर्षांपासून कमी जास्त प्रमाणात लॉकडाऊन  असल्यामुळे  शेतकरी, मजूर, कामगार इत्यादी वर्ग आर्थिक डबघाईला आला आहे,यांना मदत करणे व आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

   या निवेदनात पुढे असे म्हणण्यात आले आहे की, राज्यात कोरोना महामारीचे प्रमाण वाढले आहे.कोविड 19 या आजाराने समाजातील सर्व घटक कमी -जास्त प्रमाणात बाधित झाला आहे.या आजाराच्या भीतीने जनता त्रस्त आहे अन यावर लॉकडाऊन करून प्रशासन दहशत निर्माण करून व आपले अपयश लपवत आहे.

  आमची सरकारला विनंती सामान्य जनतेचे जे हाल होत आहेत ते थांबवा ,आणि खालील मागण्या मान्य करून आम्हास न्याय दयावा ही विनंती.

प्रमुख मागण्या-

१)कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांला ५ लाख रुपये मदत जाहीर करा.

२)रेमेडीसिविर इंजेक्शनाचा काळा बाजार थांबवा व हे इंजेक्शन मोफत द्या.

३)ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या.

४)खाजगी दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकाची होणारी लूट थांबावा..

५)सरकारी नोकरदारा प्रमाणे सामान्य जनतेला दवाखान्यात खर्च शासनाने द्यावे.(मेडिक्लेम लागू करा).

६) लॉक डाऊन हटवून जीवनमान सामान्य करावे.

यावेळी विनोद वंजारे (जिल्हा अध्यक्ष, रयत क्रांती संघटना)  बालाजी पांचाळ, बालाजी गिरी ,बाबाराव गोडबोले, शिवराम ठाकूर ,सुनील पंडित, अविनाश ढवळे ,साहेब नांदेडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित 

*निवेदन द्यायला गेल्यावर  निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी निवेदन घेण्यासाठी टाळ-टाळ करत होते तेव्हा पांडुरंग शिंदे यांचा पारा चडला. तेव्हा  शिंदे म्हणाले की,येथे लोकं मरत आहे अन तुम्ही साधं मागण्याचे निवेदन घेत नाहीत.रेमेडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार व खाजगी दवाखान्यातील होणारी लूट आधी थांबवा आम्ही येथे येत नाही.*

------------------------------------

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group