नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदाची नायगावकरांना दुसऱ्यांदा संधी मिळाली असून. यापुर्वी सन १९९४ ते १९९७ या काळात माजी आ. कै बळवंतराव चव्हाण यांनी चेअरमन पद भूषविले होते. तर आता त्यांचे पुत्र माजी आ.वसंतराव चव्हाण यांना संधी मिळाली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या महाअघाडीने भाजपाची जोरदार राजकीय धूलाई करत बँकेची एक हाती सत्ता ताब्यात घेतली. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नायगांव सोसायटी मतदार संघातून भाजपाचे जेष्ठ नेते कै.गंगाधरराव कुटूरंकर यांचा पराभव करून वसंतराव चव्हाण हे निवडून आल्याने त्यांचा राजकीय पटलावर मोठा दबदबा निर्माण झाला आहे.
निकालाच्या नंतर ना.चव्हाण यांच्या जवळचे असल्याने वसंतराव चव्हाण यांची निवड होणार असल्याचे संकेत मिळत होते तरी, या पदाच्या स्पर्धेत भोकर मतदार संघातील नामदाराचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविदंराव नागेलीकर यांचे नाव वसंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने घेतल्या जात असल्याने आता निवड कोणाची होणार याचा संस्पेंस निर्माण झाला होता. मात्र पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वसंतराव चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने अध्यक्षपदी निवडीचा मार्ग मोकळा झाला.
नायगांव मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर सन २००९ ला अपक्ष निवडूण आलेल्या वसंतरावांनी ना. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होणार असल्याने त्याना बिनशर्त पाठींबा दिला होता. तेव्हापासून जवळीकता वाढली होती. विशेष म्हणजे अनेकवेळा विरोधी पक्षाकडून राजकीय आँफर आल्या तरी त्यांनी अशोकराव चव्हाण यांच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
यापूर्वी वसंतराव चव्हाण यांचे वडील व जिल्ह्यातील एक दमदार व प्रभावी राजकारणी म्हणून परिचित असलेले कै. माजी आमदार बळवंतराव चव्हाण यांनीही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भुषविले असून. सन १९९४ ते १९९७ त्यांच्या काळात बँकेची भरभराट होती. कै. बळवंतराव चव्हाण यांचे नाव आजही जिल्हा बँकेत आदराने घेतल्या जाते. नायगावकर चव्हाण परिवारात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची या वसंतराव चव्हाण यांच्या निमित्ताने दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
————————चौकट ------------------
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची निवड झाल्याचे समजताच नायगांव येथील शिवाजी चौक व हेडगेवार चौकात फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

COMMENTS