महिला लेखन व समीक्षा' विषयावर अंतरराष्ट्रीय चर्चासत्र* *माया पंडीत यांचे बीजभाषण; देश विदेशातील विद्वानांचा सहभाग.*

 *'महिला लेखन व समीक्षा' स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबा...

 *'महिला लेखन व समीक्षा'

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने  ‘महिला लेखन व समीक्षा’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात देशविदेशातील महत्वाच्या स्त्री अभ्यासक सहभागी होणार असून इंग्लिश आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ माया पंडित यांच्या बीजभाषणाने चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या माजी कर्णधार व सुप्रसिद्ध लेखिका सोना चौधरीआणि मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ वंदना महाजन या समारोप समारंभास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दिनांक १५ एप्रिल ते १९ एप्रिल २०२१ या कालावधीत हे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून आंतरजालीय दृक्श्राव्य प्रणालीद्वारे निमंत्रित वक्ते आपला विषय मांडणार आहेत. दिनांक १५ एप्रिल रोजी कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार आहे. सुप्रसिद्ध अनुवादक आणि इंग्रजी भाषेच्या विद्वान डॉ माया पंडित या बीजभाषण करतील. नांदेड महानगरपालिकेच्या महापौर तथा शहराच्या प्रथम नागरिक सौ मोहिनीताई विजयराव येवणकर, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ जे एम बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ वैजयंता पाटील आणि मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पंचशील एकबेकर यांची यावेळी मुख्य उपस्थिती असणार आहे. असे भाषा संकुलाच्या संचालक डॉ शैलजा वाडीकर यांनी कळवले आहे. 

चर्चासत्रात बॅरिस्टर अर्चना माढेकर (टोरंटो, कॅनाडा), शिरीन कुलकर्णी (ताम्पेरे, फिनलँड),  ऍड. शिल्पा गडमडे (फ्रँकफर्ट, जर्मनी), डॉ रति सक्सेना (त्रिवेंद्रम, केरळ), डॉ तेजस्विनी कुरुंदकर (दिल्ली), डॉ अरुणा सबाने (नागपूर), डॉ  निलांबरी जगताप (कोल्हापूर), डॉ स्वाती दामोदरे (अकोला), प्रा विद्या सुर्वे बोरसे (नाशिक), प्रा. स्वाती मदनवाड (अर्धापूर) तीन भिन्न सत्रांमध्ये आपले विचार मांडणार आहेत.

चर्चासत्राचे समन्वयक डॉ पृथ्वीराज तौर यांनी सांगितले कि, चर्चासत्र नि;शुल्क असून सर्वांसाठी खुले  आहे. प्राध्यापक, अभ्यासक, विद्यार्थी व समाजसेवी संस्थेचे कार्यकर्ते यांना युट्यूबच्या माध्यमातून चर्चासत्रात सहभागी होता येईल. सर्व सहभागी प्रातिनिधींना प्रमाणपत्र देण्यात येईल. महिला आणि कायदाव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, इतिहासाचे लिंगभावकेन्द्री पुन:लेखन, वेश्यांचे प्रश्न आणि समाजवास्तव, इंग्रजी, हिंदी आणि  मराठी साहित्य आणि महिला लेखन, स्त्रीलिखित बालसाहित्य समीक्षा, भारतीयस्तरावर महिला लेखन, भारतीय क्रीडाक्षेत्रात महिलांचे स्थान आणि लैंगिक शोषण अशा विविध मुद्द्यांची सखोल चर्चा चर्चासत्रात होणार आहे. 

समारोप कार्यक्रमास भारतीय फुटबॉल संघाची माजी कर्णधार सोना चौधरी, डॉ वंदना महाजन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले असतील. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ एल एम वाघमारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. 

चर्चासत्रात सहभागी होऊन व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन भाषा संकुलाच्या संचालक डॉ शैलजा वाडीकर आणि चर्चासत्र समन्वयक डॉ पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.   


–----------------

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group