लातूर : दि.21.04.21
लातूर जिल्हा कनिष्ठ महाविदयालय शिक्षक संघटना ( जुक्टा ) च्या वतीने गुगट मिट ऑनलाईन विभागीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते ,
अध्यक्ष स्थानी प्रा. शिवाजीराव शिंदे , प्रमुख पाहुणे प्रा.व्यंकट किर्तने तर प्रमुख उपस्थीती जुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी , सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे, उस्मानाबाद अध्यक्ष प्रा. रमेश ननवरे, उपाध्यक्ष प्रा.मारूती सूर्यवंशी , उपाध्यक्ष प्रा.सी.जी. पाटील, उपाध्यक्ष प्रा.रामलींग बिडवे सहसचिव प्रा.आर.पी.केंद्रे, कोषाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील उपस्थीत होते,
सर्वप्रथम कर्तव्य बजावत असताना " कोरोना " संक्रमणात बाधीत होऊन दिवंगत कै.प्रा.काकासाहेब शिंदे उस्मानाबाद,कै.प्रा. दिलीप माने रेणापूर ,कै. प्रशांत रेडीज मुंबई ,कै.प्रा. गुलाबराव कच्छवे कबनसांगवी, कै.प्रा.सुनिल वटमवार जळकोट,कै. प्रा. हरिश्चंद्र मानकरी देगलूर ,कै.प्रा. राठोड मुखेड , कै.प्रा. इंगळे खतगाव , कै.प्रा.मारलावार नादेंड, कै. मु.अ.जनार्धन इजारे चाकूर , कै.प्रा. शिंदे भिसेवाघोली ,कै. अशोक पवार लातूर, कै. नागप्पा महाजन लातूर , कै.प्रा. संत्येद्र देशमुख अहमदपूर ,या शिक्षक व प्राध्यापकांना श्रद्धांजली वाहण्यात आली ,
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव शिंदे म्हणाले कि, सर्व प्राध्यापक , शिक्षकानी कोविड नियमाचे तंतोतंत पालन करावे , निरोगी रहावे , व्यायाम करावा, भीती बाळगू नये , जुक्टा भवन उभारणीसाठी प्रयत्न करावा , माझे पन्नास हजार देणगी जुक्टा भवनची जमा करून घ्यावी , कोरोना साठी जनजागृती व उपाययोजना बाबत विशेष प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले ,
प्रा.०यंकट किर्तने म्हणाले कि, कोरोना काळातही जुक्टा संघटनेने वर्षभर शिक्षक व प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत , सक्रीयपणे ,ऊत्साहाने ,हिरारीने झोकून देऊन जुक्टा शिक्षकांना न्याय देत असल्याचे ते म्हणाले व विचार व्यक्त केले ,
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश ननवरे म्हणाले कि , प्राध्यापकांनी मनोबल वाढवावे ,कोरोनाचा निकराने सामना करावा जनजागृती करावी , योगासन करावे , सकारात्मक विचार ग्रुप वरती व्यक्त करावेत असे ते म्हणाले ,
नादेंड चे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. मुंकुंद बोखारे म्हणाले कि , जुक्टा संघटनेने धाडसी निणर्य घेऊन प्राध्यापकाना न्याय दिला आहे, विभागातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न लातूर जुक्टा करत आहे, कोरोना काळातही विभागाचे , विनाअनुदान ट्प्पा आदेश , वाढीवपदे शिफारस , पेन्शन प्रस्ताव मार्गी प्रस्ताव मार्गी लावल्याचेही ते म्हणाले,
लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी म्हणाले कि, अनेक समाजबांधव दिवंगत झाले याचे अतीव दुःख आहे , "कोराना " काळात भीतीचे वातावरण तयार झाले आहे , मात्र घाबरून न जाता यांचा सामना करावा , शिक्षक व प्राध्यापकांनी शंभर टक्के लसीकरण करावे , वर्षभर जुक्टा च्या माध्यमातून , सेवानिवृत पेन्शन प्रस्ताव निकाली काढले , वाढीव पदाचा पाठपुरावा चालू आहे , २० टक्के अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश विभागाचा काढला व प्राध्यापकांच्या खात्यावर वेतन जमा करेपर्यंत लढा व पाठपुरावा केला , येणाऱ्या काळात वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण देणे , स्थलांतर व हस्तांतरण आदेश विभागीय उपसंचालक याना पूर्वीप्रमाणे दयावे , पवित्र पोर्टल प्रक्रिया यशस्वी झाली नाही , ती रद्द करून पूर्वी प्रमाणे सरळसेवा जाहीरात देऊन शिक्षक भरती करावी , या प्रश्नासंदर्भात राज्य महासंघाबरोबर चर्चा करून सोडवणार व मार्गी लावणार असेही ते म्हणाले ,
लातूर जुक्टा सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे यांनी वर्षभर संघटनेने केलेला पाठपुरावा व विविध प्रश्न सोडवल्याचा आढावा सादर केला , तसेच विविध " कोरोना " कवच मिळावे , २००५ नंतरच्या नियुक्त शिक्षकांना पेन्शन मिळाली पाहीजे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ते या प्रसंगी म्हणाले ,
लातूर जुक्टा उपाध्यक्ष : प्रा.मारूती सूर्यवंशी म्हणाले कि '' कोरोना " प्रार्दुभाव व लॉकडाऊन काळातही लातूर जुक्टा अध्यक्ष व सचिव व पदाधिकारी यांचे तिन जिल्हयाचे लातूर , उस्मानाबाद , नादेंड या विभागाचे शिक्षण उपसंचालक लातूर यांचे 20 टक्के टप्पा अनुदान आदेश शिक्षणाधिकारी यांना काढणे कामी व शिक्षणाधिकारी वितरण आदेश व वेतन अधिक्षक यांच्याकडून खात्यावर वेतन जमा करणे , तिन आठवडे पाठपुरावा केला व वेतन विनाअनुदान शिक्षकांच्या खात्यावर जमा झाले , मोलाचे सहकार्य जुक्टा संघटना व शिक्षण उपसंचालक मा.श्री. गणपतराव मोरे साहेब , शिक्षणाधिकारी तृप्ती ताई अंधारे मॅडम वेतन अधिक्षक मा. संजय क्षिरसागर साहेब यांचे लाभले व वेतन प्रश्न मार्गी लागला बदल यांचेही आभार व्यक्त केले ,
या प्रसंगी उपाध्यक्ष प्रा.सी.जी. पाटील , उपाध्यक्ष प्रा. रामलींग बिडवे ,सहसचिव प्रा.आर.पी.केद्रे , जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.एकनाथ पाटील ,प्रा. राजेंद्र नागरगोजे प्रा.तनशेट्टी ,प्रा.आयुब पठाण,प्रा. राजकुमार हालुकडे आदीनी विचार व्यक्त केले , आभार सचिव प्रा. बाळासाहेब बचाटे यानी मानले ,
COMMENTS