प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असुन हिंगोलीत दररोज दोनशेच्या वर रूग्ण आढळत आहेत. कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी रामनवमी निमित्ताने विनाकाराव भिसे पाटिल व पप्पु चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांना मास्क व सेनिटायझर चे वाटप करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात कोरोना चे सर्व नियम पाळून रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रामनवमी निमित्ताने ठिकठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधे रवि ईंगळे मित्र मंडळाकडून प्रभागात कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी नागरिकांना मास्क व सेनिटायझर चे वाटप करण्यात आले. तसेच संपुर्ण प्रभागात सेनिटायझर ची फवारणी करण्यात आली आहे. रामनवमी निमित्ताने या सामाजीक उपक्रमाचे आयोजन रवि ईंगळे मित्र मंडळाकडून करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम कोविड19 च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला.

COMMENTS