प्रतिनिधी/सोनपेठ
मागील अनेक दिवसापासून तालुक्यातील धार डिघोळ येथे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या नागरिकांच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सध्या स्थितीत घरोघर ताप,सर्दी,खोकला,तोंडाला चव न येणे अशा लक्षणांचे नागरिक स्वतःची तपासणी न करता इतरत्र मेडीकलवरून गोळ्या औषध आणुन घरीच खात आहेत.तर यापैकी कोरोना पॉझिटिव असलेले नागरिक सकाळ संध्याकाळ घोळक्याने गावांमधील रस्त्यावर बसून रिकामटेकड्या गप्पा मारत असल्यामुळे एकमेकाच्या संपर्कात येऊन कोरोनाचा प्रसार करत आहेत.७०० ते ८०० लोकसंख्या असलेल्या धारडीघोळ गावांमध्ये मागील पंधरा दिवसापासून कोरोनाची लक्षणे असलेले अनेक नागरिक आजाराचा सामना करत आहेत.अशावेळी सोनपेठ येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी या गावांमध्ये तपासणीच्या अनुषंगाने मागील आठवड्यात कॅम्पचे आयोजन केले होते.परंतु डॉक्टरची टिम गावांमध्ये दाखल होताच,गावातील नागरिकांनी शेतामध्ये पळ काढला.यावेळी डॉक्टरांनी सांगितले की,रॅपिड किटवर तपासणी केल्यास तात्काळ निकाल कळत असल्यामुळे आम्ही तुमची रॅपिड वर तपासणी न करता आरटीपीसीआर तपासणी करूत.जेनेकरुन त्याचा निकाल येण्यासाठी आठवडाभर लागतो.असे सांगताच गावातील ५० लोकांनी आपल्या लाळेचे नमुने दिले.कारण एवढेच होते की,आपल्याला तपासणी केल्यानंतर आपण कोरोना पॉझिटिव्ह निघालो तर ही बाब लोकांना कळेल?परंतु या नागरिकांच्या अज्ञानपणामुळे आज गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती तापीने फनफनतांना दिसत आहे.सध्या स्थितीत गावांमध्ये तपासणी केलेल्या ५० रुग्णांपैकी पंधरा ते वीस रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ते सोनपेठ येथील सेंटरमध्ये दाखल न होताच इतरत्र मेडिकल वरून गोळ्या औषध आणून घरीच खात आहेत.तर सकाळ संध्याकाळ रस्त्यावर घोळक्याने बसून एकमेकांना गप्पा मारत असल्यामुळे गावामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.परिणामी येथील नागरिकांच्या अज्ञानपणामुळे रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून गावातील नागरीक आजार अंगावर काढताना दिसत आहेत.या गंभीर बाबीकडे तालुका प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन येथील संपूर्ण ग्रामस्थांच्या जबरदस्तीने कोरोना रॅपिड किटवर तात्काळ तपासण्या कराव्यात.व यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सोनपेठ येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याची मागणी करण्यात येत आहे.अन्यथा गावातील इतर लोक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्ण संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
COMMENTS