धर्माबाद (अहमद लड्डा)
तालुक्यातील चिंचोली येथील धर्मगुरू सोमशंकर महाराज चिंचोलीकर यांचे चिंचोली या गावी निधन झाले.
श्री संत सोमशंकर महाराज यांनी संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज यांच्या कपिलाधार येथे श्रीक्षेत्र कुंटल सोमन्ना तेलंगाना पासून कपिलाधार पर्यंत पायी पदयात्रेची सुरुवात करून राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या सोबत धर्माबाद तालुक्यात व परिसरात धर्म प्रचाराचे कार्य केले सोमशंकर शिवाचार्य महाराजांचे वय 54 वर्ष होते.
श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींचे त्यांनी चिंचोली येथे भव्य मंदीर बांधले असून याठिकाणी प्रतिवर्षी मन्मथ पौर्णिमेला मोठी यात्राही भरते. पंचक्रोशी मध्ये सोमशंकर महाराजांना खूप मान होता व त्यांचा भक्त समुदाय खूप मोठा होता
त्यांच्या अचानक जाण्याने भक्तांनी शोक व्यक्त केल्या असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिंगायत समाजाचे प्रतिनिधि शिवराज पाटील गाडीवान, बाजार समितीचे संचालक रमेश गौड,जंगम समाजाचे अध्यक्ष मन्मथ स्वामी रोशनगावकर , संतोष पाटील विभुते यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
चिंचोली गावालगतच असणाऱ्या श्री संत शिरोमणी मन्मथ माउली परिसरातच त्यांचा अंत्यविधी दिनांक 4-4- 2021 रोजी आणि साडेनऊ वाजता करण्यात आला
चिंचोली येथिल गावकरी उपस्थित होते.

COMMENTS