शासनाच्या नियमांचे पालन करीत पवित्र रमजान महिना साजरा करा- मलपिल्लु

प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असुन शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत पवित्र रमजान महिना ...


प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असुन शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करीत पवित्र रमजान महिना साजरा करण्यासाठी बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश मलपिल्लु यांनी ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावात जाऊन मुस्लिम बांधव व मौलवींच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे.  बासंबा पोलिस ठाण्याचे हद्दीत एकुण 66 गावांचा समावेश असुन 11 गावांमध्ये मोठ्या मस्जीत व मुस्लिम समाज बांधवांची संख्या जास्त आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांनी  ठाणेदारांना आगामी रमजान महिन्या निमित्ताने काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत बासंबा पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश मलपिल्लु यांनी सावरखेडा येथील मदरशात मौलवींची बैठक घेऊन शासनाने काढलेल्या परिपत्रकाची माहिती दिली. ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू चा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असुन त्या संदर्भात योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात यावे. 13 एप्रिल ते 14 मे च्या दरम्यान रमजान महिना साजरा केला जाणार असुन पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने मस्जीत मध्ये जाऊन सार्वजनीक नमाज आदा करण्याची प्रथा आहे. याकाळात मुस्लिम समाज  नमाज तराविह व ईप्तार. साठी एकत्र येतात. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुस्लिम समाज बांधवाने राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे पालन करने आवश्यक आहे. करोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुस्लिम समाज बांधवांनी पवित्र रमजान महिन्यात एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी मस्जीत मध्ये नमाज पठण, तराविह साठी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरीच साजरे करावे. नमाजासाठी मस्जिद मध्ये एकत्र येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र येऊ नये, सोशल डिस्टसिंग व स्वच्छतेचे सर्व नियम पाळावे. मास्क सेनिटायझर चा उपयोग करून पवित्र रमजान महिना अत्यंत साध्य ा पद्धतीने साजरा करावा. रमजान महिन्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करण्याचे आवाहन बासंबा चे ठाणेदार सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेश मलपिल्लु यांनी मुस्लिम बांधवांना केले आहे. यावेळी मलपिल्लु यांना मुस्लिम बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group