खा. प्रीतम मुंडे यांची माजलगावात कोरोना सेंटरला भेट देताच रुग्णांनी मांडल्या तक्रारी
माजलगाव/प्रतिनिधी
गेल्या चार दिवसापासून मी जिल्ह्यात कोरोना रुग्णालयातील परस्थिती पाहत आहे.यादरम्यान ठीकठिकाणी स्वच्छता अन्न आणि औषधा बाबतीत तुटवडा जाणवत असून सर्वत्र रुग्णालयांच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत.ही परिस्थिती चिंताजनक असून लवकरच या बाबतीत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती खासदार प्रीतम मुंडे यांनी या दौऱ्यादरम्यान व्यक्त केली.
रविवार दिनांक 17 रोजी दुपारी 1 वाजता खासदार पितम मुंडे यांनी शासकीय कोव्हीड सेंटर,यशवंत कोव्हीड रुग्णालय, इतर कोरोना रुग्णालयाला भेट दिली.या भेटीदरम्यान रुग्णांनी शासकीय कोव्हीड सेंटरला असणाऱ्या गैरसोयींचा पाडा खासदार प्रीतम मुंडे यांच्यासमोर वाचला.या वेळी रुग्णांनी रुग्णालयात दिल्या जाणारे निकृष्ट जेवण, सर्वत्र पसरलेली अस्वच्छता निमित्त मिळणारा औषध पुरवठा याबाबतीत प्रमुख गरानी मांडली.दरम्यान खासदार ताईनी ही समस्या जिल्ह्यात सर्वत्र असल्याची खंत यावेळी व्यक्त केली.तर औषध तुटवडा हा संपूर्ण राज्यात जाणवत असून सरकार याबाबत कमी पड़त असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.दरम्यान सद्यस्थितीत कोरोना आजाराबाबत लोकांनी जागरूक राहून सतर्क राहावे.लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान दौरा संपताच तात्काळ जिल्हाधिकार्यांशी भेट घेत मी याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत, बबनराव सोळंके, डॉ अशोकराव तिडके, नितीन नाईकनवरे, विनायक रत्नपारखी, डॉ भगवानराव सरवदे, दीपक मुंडे, शरद यादव, सुरेश दळवे, सत्यनारायण उनवणे, सुशांत जाधवर बाळासाहेब शिरसागर यांच्या सह भाजपचे कार्येकर्ते उपस्थित होते.
--------------------------------------
ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची सोय ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी - वैद्यकीय अधिकारी
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांच्या उपचारासाठी शहरात असणारे कोव्हीड सेंटर गैरसोयीचे ठरत आहे. त्याचप्रमाणे या गोष्टीचा अतिरिक्त ताण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या व्यवस्थेवर पडत आहे.त्यामुळे ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या उपचाराची सोय ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्याच ठिकाणी करण्याची मागणी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खा.मुंडे यांच्याकडे केली.
---------------------------------
या कोवोड सेंटरला कशाचीच सोय नाही - कोरोना रुग्ण
मी ऍडमिट झाल्यापासून पाहतो तर येथे या कोविड सेंटरला रुग्णांना स्वतःच सौचालय साफ करावे लागत आहे.आणि येथील कोरोना रुग्णाला जेवण बरोबर दिले जात नाही रुग्णाची व्यवस्थाच झाली नाही तर रुग्ण बरा होऊन घरी कधी जाणार असे रुग्ण बोलत आहेत.

COMMENTS