माजलगाव: प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने निर्बंध कडक करून देखील माजलगावच्या रस्त्यांवरील विनाकारण हिंडणार्या लोकांच्या संख्येत फरक पडत नव्हता म्हणून येथील तहसीलदार , पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर टेस्टरूपी कार्यवाहीचा बडगा उगारला यात 94 हिंडफिरयांच्या चाचणी करण्यात आली त्यात 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले ही कार्यवाही पुढे देखील सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
माजलगाव शहरात विना कारण फिरणाऱ्याची संख्या वाढत असल्यामुळे तहसीलदार वैशाली पाटील, नगरपालिकाचे मुख्याधिकारी विशाल भोसले , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी माजलगाव शहरात अत्यावश्यक सेवा देणारे, व्यापारी, दुकानदार, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची जाग्यावरच अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम सुरू करण्यासंदर्भात दि. 17 फेब्रुवारी पासून निर्णय घेऊन तशी कल्पना समाज माध्यमांमधून देण्यात आली होती त्यानुसार रविवारी सकाळी 10 वाजल्यापासूनच येथील शहर पोलीस स्टेशनच्या समोर कार्यवाहिला सुरुवात केली त्यात 94 जणांची चाचणी करण्यात आली असता 5 जण पॉझिटिव्ह आले
यावरून कोरोनाच्या गंभीरतेची प्रचिती येते. नागरिकांनी नियमांचे पालन करीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे तसेच कुठलेही महत्वाचे काम नसताना बाहेर फिरू नये असे आवाहन करून देखील लोक रस्त्यावरून फिरू लागल्याने प्रशासनाला आता हे पाऊल उचलावे लागले आहे.
दरम्यान रस्त्यावरून फिरणाऱ्यांच्या टेस्ट होत असल्याचे पाहून अनेकांनी वाट वाकडी करीत पळ काढला त्यामुळे दुपारनंतर शहरात संपूर्ण शुकशुकाट पहावयास मिळाला.
या मोहिमेत पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, न प चे मुख्याधिकारी विशाल भोसले, उपनिरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक जयराज भटकर, पोउनी विजय थोटे, पालिका कर्मचारी जगदीश जाधवर , आशिष तुसे, संतोष घाडगे, संदीप रांजवन, शंकर चव्हाण आदींसह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

COMMENTS