गेली महीनाभरापासुन अवैध उत्खनन जोमाने सुरू असल्याचे
तलाठी, मंडळ अधिकारी यांना माहीत असताना त्यांची मात्र नुसती बघ्याची भुमिका
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील सलगरा फाटा ते बेटमोगरा या ११ कि.मी.अंतर असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व डागडुगीकरणाच्या कामाची मंजुरी वर्ष दिड वर्षापुर्वीच होती परंतु काही तांत्रीक अडचणीमुळे व तद्नंतर उद्भवलेल्या कोरोणाच्या सावटामुळे ११ कि.मी.रत्यापैकी अंदाजे २ कि.मी.अंतराचे काम रखडले होते त्या रस्त्याचे काम सध्यस्थितीत बेटमोगरा गावालगत उच्चा कॉर्नर पासून ते शंकरनगर कडे जाणारा टाकळी बु.कॉर्नर पर्यंत च्या रत्याचे काम सुरू असून सदरचे काम हे मुखेड येथील चौधरी कन्ट्रक्शन च्या माध्यमातून कंत्राटदार व्हि.एम.चौधरी यांच्या मार्फत करण्यात येत असून सदर कामासाठी बेटमोगरा सज्जातील गट क्रं.३०२ मध्ये शासकीय गायरान जमीनीवरील मुरुम व दगडाचे अवैध उत्खनन गेली महीनाभरापासून जोमात सुरू असून त्यामुळे शासनाच्या जमीनीचे व खनीज संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाचा लाखोंचा महसुल बुडत आहे. त्यामुळे अवैध उत्खनन होत असलेल्या ठिकाणचा तात्काळ पंचनामा करून
अवैध उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कठोर कार्यवाही करण्यात यावी असे लेखी निवेदन भारतीय जनता पार्टीचे मुखेड तालुका सचिव मष्णाजी पटील बेटमोगरेकर व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे यांनी दि. ५ मार्च रोजी मुखेड तहसिलदार के.एच.पाटील यांना दिले. यामध्ये त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी दोषींवर योग्य कार्यवाही नाही तहसिल कार्यालयासमोर भव्य स्वरुपात साखळी उपोषण करण्यात येईल असा प्रशासनाला इशारा दिला.
-------------------------------------

COMMENTS