परभणी/सिद्धेश्वर गिरी
शेतकऱ्यांकडुन सोलारपंपाच्या अनुदान अर्जावर सह्या करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या महावितरण कंपनीच्या सहय्यक अभियंत्यासह अन्य एका कंत्राटी कर्मचाऱ्यांस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज सोमवारी रोजी रंगेहात पकडले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार शेतकरी याने एका कंपनीतर्फे सोलरपंप बसवले.या पंपाचे अनुदान मिळविण्यासाठी महावितरण कंपनीतील जिंतूर ग्रामीण मधिल बोरी येथील सहाय्यक अभियंता सुधाकर जाधव यांच्यासह कंत्राटी तंत्रज्ञ बाळासाहेब बुधवंत यांना 18 फेब्रुवारी रोजी संपर्क केला असता अर्जावर सही करण्यासाठी प्रती सही पाचशे रुपयांची लाच मागितली.तसेच लाच दिली तरच सह्या देईल, असे सहाय्यक अभियंत्यांनी म्हटले. यामुळे लाच देण्यास इच्छुक नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलूचपत प्रतिबंधकचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे, पोलिस निरीक्षक अमोल कडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची खात्री करून आज सोमवार (दि.1) रोजी श्री. हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल कडू, व कर्मचारी यांनी सापळा लावला व तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंत्यासह कंत्राटी कर्मचार्यास रंगे हात पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
COMMENTS