प्राथमिक आरोग्य केंद्र विडा येथे
कोरोना लसीकरण केंद्राचे सरपंच सुरज पटाईत यांच्या हस्ते शुभारंभ.
मस्साजोग प्रतिनिधी-केज तालुक्यातील विडा येथील
प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ सोहळा सरपंच सुरज भैय्या पटाईत यांच्या हस्ते दिनांक ९ मार्च मंगळवार रोजी करण्यात आला अधिक माहिती अशी की विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना लसीकरण केंद्रात 45 वर्षा पेक्ष्या अधिक वय असणाऱ्या सर्व व्यक्तीना कोरोना आजाराची लसीकरणाची लस देण्यात येणार आहे . या कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित सरपंच सुरज भैय्या पटाईत डॉ .सोनवणे मॅडम,डॉ धनराज पवार,नामदेव आंधळे ,लहू घोरपडे, गोविंद पटाईत, राजाभाऊ शिंदे,व सर्व कर्मचारी उपस्थित विडा पंचक्रोशीतील नागरीक व गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे
कोरोना लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला

COMMENTS