जामदरी ता.भोकर येथील आदिवासी आश्रम शाळा स्त्री अधीक्षिका बेबी पांडुरंग कुरुडे यांना संस्थेने दोन वर्षाची प्रकल्प कार्यालयाकडून मान्यता असताना प्रसूती रजेच्या नंतर शाळेमध्ये रूजू करून न घेता व पुढील मान्यतेचा प्रस्ताव कार्यालयास सादर न करता एका स्त्रीवर जो अन्याय केला आहे त्याविरुद्ध अनेक स्तरावर न्याय मागण्याचा प्रयत्न कुरडे ताईने केला. पण वरिष्ठ कार्यालयाने व संस्थेने व्यवस्थित प्रकरणं न हाताळल्यामुळे आज त्यांना प्रकल्प कार्यालयासमोर उपोषण करावे लागत आहे. ही अपरिहार्यता निर्माण करणाऱ्या संस्थाचालकांचा भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागातर्फे जाहीर निषेध. आज दिनांक २.३.२०२२ रोजी प्रकल्प कार्यालय किनवट येथे कुरडे ताईंच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे.
भाजपा शिक्षक आघाडी किनवट तालुका संयोजक श्री शिवाजीराव बरबडकर यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकल्प अधिकारी श्री पुजार साहेब हे अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी नांदेडला गेलेले आहेत व आज सायंकाळपर्यंत प्रकल्प कार्यालयात परत येणार आहेत. भाजपा शिक्षक आघाडी नांदेड जिल्हा सहसंयोजक प्राध्यापक पुरुषोत्तम यरडलवार सर व नांदेड जिल्हा संयोजक हावगी राव गोपछडे यांच्यासह सकाळीच मराठवाडा विभागाचे संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी
पुजार साहेबांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. साहेब आपल्यासाठी सकारात्मक आहेत.
प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी वर्गांशी सकारात्मक चर्चा करून स्त्री अधीक्षिका बेबी पांडुरंग कुरुडे यांना मूळ आस्थापनेवर रुजू करून घ्यायला प्रकल्प कार्यालयाच्या सहकार्याने संस्थेस भाग पाडून त्यांचा मान्यतेचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजेच अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथे पाठवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी प्राध्यापक पुरुषोत्तम यरडलवार व शिवाजीराव बरबडकर हे प्रयत्न करत आहेत. आपल्या संघटनेच्या प्रयत्नांना यश निश्चित मिळेल असे वाटते. सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सक्रिय पाठिंबा नोंदवावा. संघटनात्मक प्रयत्नांमध्ये आणखी जीव ओतण्यासाठी किनवट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव जी केराम साहेब हे सुद्धा आपल्याशी सहकार्य करणार आहेत.स्त्री अधीक्षिका वर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सक्रीय सहभाग भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभाग नोंदवत आहे.
प्रश्नाचा अभ्यास करून तो प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना परिचित असलेले प्रा.नितीन कुलकर्णी हा प्रश्न प्रशासनाच्या सहकार्याने निश्चित सोडवतील असा विश्र्वास प्रा. बरबड कर व प्रा. यरडलवार यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS