मुंबई दि.२: महाड एम.आय डी.सी मधील सानिका फार्मास्युटिकल कंपनी मधील कंत्राटी आणि कायम मिळून सुमारे १२५ कामगारांना मासिक ७५०० रुपये भरघोस पगारवाढ मिळवून देणारा करार नुकताच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांच्या पुढाकाराने घडला आहे.संबंधित युनिट पहाणारे युनियनचे सेक्रेटरी किशोर रहाटे यांचे प्रयत्न विशेष महत्त्वपूर्ण ठरले आहेत.लॉकडाऊ मध्ये ही कंपनी आत्यावक औषध निर्मितीमुळे बंद नव्हती.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्या नंतर, बिघडलेल्या महाड औद्योगिक परासरात युनियनद्वारे सचिन अहिर यांच्या कुशल नेतृत्वातून इतका चांगला पगार वाढीचा करार घडवून आणणारी ही या परिसरातील पहिलीच केमिकल कंपनी आहे.
कोरोना महामारीच्या काळात युनियनने सर्व सुरक्षित उपायांची काटेकोरपणे उपाययोजना करून घेतली होती.कामगारांनी मनोबल वाढवून उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत केले आणि व्यस्थापनानेही उत्तम सहकार्य केले. या सर्वांचा परिपाक म्हणून व्यवस्थाबरोबर हा चांगल्या पगारवाढीचा करार घडून आला.अध्यक्षां बरोबरच युनियनचे उपाध्यक्ष सुनिलभाऊ अहिर,सेक्रेटरी किशोर रहाटे,सुधीर भोसले कंपनीच्या वतीने महाव्यवस्थापक शेखर ठाकूर, अमित करंबे,अजय मिश्रा यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.करार तीन वर्षासाठी आहे.कामगारांनी या पगार वाढीचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी या पगार वाढीच्या कराराचे स्वागत केले आहे. या पगार वाढीच्या करारातून कायम कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारां लाभ होणार आहे, हे या पगार वाढीचे वैशिष्ट्य आहे.
◆◆◆काशिनाथ माटल◆◆◆◆

COMMENTS