![]() |
माजलगाव (प्रतिनिधी)
दिव्यांग व्यक्तीची स्वतंत्र जनगणना असायला पाहिजे ,दिव्यांगाच्या प्रकारानुसार त्याची आकडेवारी असायला पाहिजे यासाठी ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून
समाज कल्याण विभाग बीड यांनी "दिव्यांगसाथी " नावाची वेबसाइट सुरू केली आहे . या वेबसाईटवर जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाची नोंदणी करणे सुरू आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगाची नोंदणी अंगणवाडी सेविके मार्फत करण्यात येत आहे. नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाची नोंदणी दिव्यांग शाळेतील शिक्षकांच्या मार्फत होत आहे. तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग शाळेत नाव नोंदणी सुरू आहे. तरी सर्व दिव्यांगानी नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे. सदर पत्रकात पुढे म्हटले आहे की, यापुढे शासनाच्या सर्व योजना या वेबसाईटच्या माध्यमातून मिळणार आहे.यापुढे दिव्यांगाना प्रत्येक वेळी फार्म भरायची वेळ येणार नाही.त्याकरिता सर्व दिव्यांगाची नोंदणी करायची आहे.
सर्व सामाजिक संघटना ,दिव्यांग क्षेत्रात काम करणारे त्यांनी सर्वच दिव्यांगाची नोंदणी होईल यासाठी सहकार्य करावे असे आवाहन घोडके यांनी केले आहे.

COMMENTS