*नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गावे समाविष्ट होणार*
*कृषिमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती मागणी*
सोनपेठ/प्रतिनिधी
मागील शासनाने ग्रामीण भागात शेती व आधारित व्यवसायावर मोठ्या प्रमाणात विकासनिधी खर्च करण्याचे धोरण अवलंबिले होते.यात कृषी विभागाच्या वतीने नानाजी देशम6कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली होती.या योजनेच्या माध्यमातून गावातील शेती व शेतीवर आधारित असणाऱ्या व्यवसायास भरभरून निधी उपलब्ध करून दिलेला आहे.यामुळे शेतकरी आर्थिकरित्या मजबूत होत असल्याचे चित्र दिसुन येत होते.हा विकास करीत असताना काही योजनेतून अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे काही गावे वगळली असल्याचा प्रकार झाला होता.यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सोनपेठ तालुक्यातील शिर्शी, कान्हेगाव, शिरोरी या गावांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले असल्याचा आरोप युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी राज्य सरकारला पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला होता.यासोबतच वरील गावे या योजनेत समाविष्ट करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती.या निवेदनाची दखल नुकतीच राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने घेण्यात आली असून कृषी विभागाचे खाजगी सचिव यांनी याबाबत परभणीच्या कृषी विभागास तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

COMMENTS