राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या हजरत सय्यद सनाऊल्लाह शाह उपाख्य सोनापीर बाबांचा उर्स सोहळा प्रतिवर्षी 5 ते 10 मार्च दरम्यान साजरा करण्यात येतो.यावर्षी मात्र कोरोनाचा पुनश्च उपद्रव वाढल्याने साजरा करण्यात येणारा उर्स महोत्सव रद्द करण्यात आल्या बाबतचे निवेदन मुजावर (मूतवल्ली ) फकीर मोहम्मद शे.चाँद यांनी तहसीलदार राकेश गिड्डे यांना दि.2 मार्च 2021 रोजी दिले आहे.
उर्स उत्सव काळात दरवर्षी देशाच्या कानाकोप-यातून हजारों भाविक सरकार सोनापीर बाबाच्या दर्शनासाठी माहूरला येत असतात,त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून तसेच शासन/प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी उत्सव समितीने या वर्षीचा उर्स महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख फकीर मोहम्मद यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
*या वर्षीचा उर्स महोत्सव रद्द केल्याने बाबांच्या भक्तांनी दर्शनासाठी येऊ नये * असे आवाहन मुजावर फकीर मोहम्मद शे.चाँद यांनी केले आहे*.


COMMENTS