महेंद्र पुरी, हिंगोली
कोरोना बिमारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च दरम्यान कडक लाँकडाऊन करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत जिल्हात सर्वच कडकडीत बंद राहणार असल्याने लाँकडाऊन च्या काळात चोरट्या पद्धतीने दारू विक्री करण्यासाठी नेत असलेल्या अवैध दारू वाहतुकिवर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून सव्वा लाखाचा मुद्दे माल जप्त केला आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार बळीराम बंदखडके यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून कारवाडी फाटा येथे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू वाहतुक करत असेल्या अँटोचालकासह एकास ताब्यात घेतले असुन 12 बाँक्स अवैध देशी दारू सह एक अँटो जप्त केला आहे. ज्याची किंमत 86 हजार रूपये आहे. तर दुसऱ्या कारवाईत जवळा पळशी मार्गावर एका मोटरसायकल सहीत देशी दारूच्या 90 बोटल जप्त केल्या आहेत. ज्याची किंमत 37 हजार 200 रूपये आहे. असा एकुन सव्वा लाखाचा मूद्देमाल जप्त केला आहे।. या प्रकरणी कचरू बबन चव्हाण, सुनिल शिवाजी रणदिवे, मदन दत्तराव काळे या तीन आरोपी विरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, ग्रामीण उपाधीक्षक वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळीराम बंदखडके, उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, जमादार वाठोरे, रवि हरकाळ, धामणे, पोले, पारीसकर यांच्या पथकाने केली आहे..
तर लाँकडाऊन असो कि ड्राय डे हिंगोली जिल्ह्यात होते दारूची विक्री हिंगोली जिल्ह्यात दारूबंदी विभाग नावालाच उरला असुन दारुबंदी विभागाकडुन अवैध दारूविक्री वर कारावायाच होत नाहीत. त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अवैध दारूविक्री वाढली आहे.. अवैध दारूविक्री वर अंकूश बसविण्याचे काम दारूबंदी विभागाचे असताना सुध्दा पोलिस विभागाला करावे लागत आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर पोलिसांच्या च जास्त कारवाया आहेत.

COMMENTS