केज दि १(प्रतिनिधी
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन एच बी सौदागर यांनी केले ते प्रमिला देवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तालुक्यातील नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. मराठी भाषा वांगमय मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपस्थितांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे अनावरण झाले.उपस्थितांचे उत्स्फूर्तपणे काव्यवाचन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ दादासाहेब मोटे, प्रमुख पाहुणे भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य एच बी सौदागर हे होते. प्रमुख उपस्थिती मराठी विभागप्रमुख प्रा डॉ शंकर वाघमारे यांची होती.
पुढे बोलताना ते म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आंबेजोगाई येथे मराठी भाषेचे विद्यापीठ होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे मराठी भाषा ही इतर भाषांना सामावून घेत समृद्ध होत आहे. कथा, कविता, कादंबरी ,नाटक आदित्य साहित्य प्रकारांमधून मराठीची गोडी मनावर अधिराज्य करत असते.असे मत व्यक्त केले
मराठी भाषा साहित्यातून फुलत जाते. मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिकतम मराठी शब्दांचा वापर व्हायला हवा असे मत डॉ मोटे यांनी व्यक्त केले.
डॉ चित्रा धामणे यांनी विषारी जळू ही कविता सादर केली. प्रा विजय मस्के,प्रा एसटी मुजावर,प्रा बचुटे, प्रा सलीम,प्रा अमिना फारोखी, प्रा कलाने, श्री विठ्ठल जामकर आदींनी उत्स्फूर्तपणे विविध कविता सादर केल्या.यावेळी प्रा मातकर,प्रा देशमुख ,प्रा लोमटे,प्रा जाधव आदींची उपस्थिती होती.
प्रा शंकर वाघमारे यांनी मराठी भाषेचा जागर तेवत ठेवण्याचे आवाहन प्रस्ताविकातून केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा मुजावर यांनी केले आभार बचुटे यांनी मानले. सोशल डिस्टन्स चे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.
सौदागर यांनी
तिर्रकस मधून
मराठी शाळेकडे कानाडोळा
विद्यापीठ स्थापनेचे गाणे गावे,
मावशीचा मनी द्वेष नको
माय मराठी जपत जावे
यावर उपरोधिक प्रकाश टाकला
प्रा मुजावर यांनी
'होय साहेब पुन्हा बिनधास्त लॉकडावुन करा,
पण गरीबाच्या घरचा किराणा भरा'
ही कविता वाचन केले.
प्रा डॉ शंकर वाघमारे यांनी
'बाप सकाळी सकाळी उठायचा ,दगडं घडायला बसायचा,हाताला घट्टे पडले तरी हाताला नाही बघायचा"
ही कविता सादर केली.
प्रा फारोखी यांनी
थक गया मै करते करते याद तुझको ,अब तुझमे याद आना चाहता हूँ
ही गझल सादर करून टाळ्या मिळवल्या.
प्रा बचुटे यांनी
'काळ्या ढेकळाचं रान काळ्या डांबराने माखवलं
आम्ही आडोसा मागत होतो
स्वप्न लवासाच दाखवलं"
ही कविता सादर केली

COMMENTS