धुनकवाड येथील नेट पास झालेला पहिला विद्यार्थी.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
धारूर( प्रतिनिधी) धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील सर्व सामान्य कुटुंबातील मुलगा अशोक त्रिंबक भोसले हा नेट परिक्षेत उत्तीर्ण होऊन धुनकवाड येथील तो पहिला विद्यार्थी ठरला असुन गावाचे नाव झळकवले आहे.
सीएसआयआर - युजीसी दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या साहय्यक प्राध्यापक व ज्युनिअर रिसर्च फेलो या पदाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी नेट परिक्षेत रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयात उत्तीर्ण झाला आहे.
२०२० या वर्षी घेण्यात आलेल्या नेटच्या परिक्षेत हा उत्तीर्ण झाला आहे .प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे व पुढील शिक्षण बार्शी येथे झाले असुन एमएस्सी केमिस्ट्री पदवीत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पुर्ण झाले आहे.
डोंगरपट्यातील शिक्षण क्षेत्रातील यशस्वी नाव आहे. परंतु या नावाच्या पाठिशी असलेल्या अनंत यातना, दुःख, हालअपेष्टा, संघर्ष पाहिला तर निश्चितच नवतरूणाईला प्रेरणा मिळेल. अशीच आहे.ग्रामीण भागातून आलेल्या अशोक भोसलेंनी अफाट मेहनतीच्या, परिश्रमाच्या बळावर यशोसिद्धी गाठली आहे. घरात कसलीही शिक्षणाची परंपरा नाही.उलट त्याचे वडील शेतकरी असुन ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
जिद्द,चिकाटी,संयम,आत्मविश्वासामुळे हे यश प्राप्त करता आले व आई-वडीलांच्या कष्टाचे चीज केल्याचे मान उंचावल्याचा आनंद झाला असल्याची भावना अशोक भोसले यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील डोंगरपट्यातील या विद्यार्थ्यानी हे यश संपादन केले असुन धुनकवाडचा हा हिरा चमकल्याने तालुक्याची व धुनकवाडकरांची मान उंचावली आहे. धुनकवाड येथील हा पहीला नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा मान यांना मिळाला असुन.त्याच्या या यशाबद्ल त्याचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS