केज प्रतिनिधी तालुक्यातील कुंबेफळ येथे आपल्या शेताच्या कडेला बसलेल्या बाबुराव जाडकर या 90 वर्षीय वृद्ध इस माचा एका वाटसरु निर्वस्त्र तरुणाने...
केज प्रतिनिधी
तालुक्यातील कुंबेफळ येथे आपल्या शेताच्या कडेला बसलेल्या बाबुराव जाडकर या 90 वर्षीय वृद्ध इस माचा एका वाटसरु निर्वस्त्र तरुणाने मारहाण करून व डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना दुपारी चार वाजता आज सोमवार रोजी घडली आहे. बाबुराव जाडकर हे आपल्या सारणी आनंदगाव रस्त्यालगत असलेल्या खडी क्रेशर जवळ रस्त्याच्या कडेला थांबले आसता रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका वाटसरु व्यक्तीने त्यांना मारहाण करत डोक्यात दगड घातला आहे यात त्यांचा जाग्यावर मृत्यू झाला आहे. त्यांच्या शेता जवळ काही जन काम करत असताना त्यांच्या निर्दशनास ही घटना घडलेली दिसल्यावर त्यांनी त्यांच्या घरच्यांना कळवले . नंतर युसुफ वडगाव पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते.

COMMENTS