मस्साजोग प्रतिनिधी केज-अंबाजोगाई रोडवर दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी१:३० वा. अंबाजोगाई कडुन बीडकडे जाणाऱ्या एका शिवशाही एसटी बसच्या क्र. (एमए...
मस्साजोग प्रतिनिधी केज-अंबाजोगाई रोडवर दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी१:३० वा. अंबाजोगाई कडुन बीडकडे जाणाऱ्या एका शिवशाही एसटी बसच्या क्र. (एमएच-०९/ एफएल-१०४२) टायरखाली येथील उपजिल्हा रुग्णालय समोर काशीबाई रामभाऊ थोरात वय वर्ष ६५ वर्ष या महिलेस चिरडल्याने तिची कवटी फुटून जागीच मृत्यू झाला.
केज उपजिल्हा रुग्णालय समोर मेडिकल दुकाने, हॉटेल्सचे प्रमाण मोठे आहे. उपचारासाठी ग्रामीण भागातील जनतेची वर्दळ मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते. रुग्णालयासमोर उतार असल्याने वाहनांचा प्रचंड वेग असतो कसल्याच प्रकारचे गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे होण्याचे प्रमाण जास्त वाढु लागले आहे.तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन घडलेल्या प्रकारानंतर कमीत कमी तीन गतिरोधक करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

COMMENTS