नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव नगरपंचायत निवडणूकीसाठी अनेक इच्छुकांनी कंबर कासल्याने नायगावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज झाली असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीराव भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 9 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता नरसी येथील भिलवंडे यांच्या फ्रॉमहाऊस येथे नगरपंचायत इच्छुकांची व राष्ट्रवादीच्या तालुकानिहाय कार्यकर्त्यांची आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे नायगांव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी दिली आहे.
दरम्यान नुकतेच ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपल्या असून नायगांव नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंध जिल्ह्याच्या दौऱ्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भोसीकर हे आढावा बैठक घेण्यासाठी दोन दिवसांपासून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत,असो तेथील पक्षांची माहिती घेत विचारमय करून आढावा घेण्यासाठी ९ तारखीला नरसी येथे राष्ट्रवादीच्या नायगांव तालुकानिहाय आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी नायगांव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवून चार सदस्य निवडून आणाले होते.
परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने ना.अजितदादा पवार,जिल्ह्याचे जेष्ट नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांच्या नेतत्वाखाली नायगाव नगरपंचायत मध्ये युतीचा धर्म पाळून महाविकास आघाडी एकत्रित येऊन समान जागा वाटप झाल्यातर युतीचा धर्म पाळू अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज असून राष्ट्रवादीच्या तालुकानिहाय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नायगांव तालुकाध्यक्ष भास्कर पा. भिलवंडे यांनी केले आहे.

COMMENTS