नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
आज दि. ७ फेबुवारी रोजी कमळेवाडी फाटा मुखेड येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीत भावी काळात मुखेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी व पक्षाची ध्येयधोरणे तालुक्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली भजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर विरभद्र हिमगिरे यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची आज नियुक्ती केली आहे .
यामध्ये
युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षपदी बालाजी पाटील सकनुरकर यांची निवड करण्यात आली आहे . तर वैद्यकीय आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी डॉ. प्रविणकुमार गव्हाणे यांची निवड करण्यात आली आहे . मुखेड शहर अध्यक्षपदी किशोरसिंह चौहाण . तर राजकुमार बामणे , शिवकुमार बंडे 'संदीप काळे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणून सावरमाळ येथील विजय कुमार स्वामी बेटमोगरा येथील दत्ता पाटील मुजळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .व्यंकटराव जाधव वसूरकर यांची तालुका भाजपा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे .
यावेळी भाजपाचे तालुका पदाधिकारी अध्यक्ष ,उपाध्यक्ष , सरचिटणीस सदस्य महिला आघाडी सर्व शक्ती केंद्रप्रमुख , बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते .

COMMENTS