केज । प्रतिनिधी
*केज तालुका झुंजार पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली असुन अध्यक्षी पदी दशरथ चवरे तर सचिवपदी दत्तात्रय हंडीबाग यांची निवड झाली असून सर्वस्तरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.*
शेतकरी,गोरगरीब, वंचित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केज येथे नवनिर्वाचित झुंजार पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी दशरथ चौरे तर सचिवपदी दत्तात्रय हंडीबाग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
प्रसंगी सतीश केजकर,अमोल जाधव,नंदकुमार मोरे,चंद्रकांत पाटील, अनिल गलांडे,रमेश ईतापे,वाजेद शेख,अशोक भोसले,बळीराम भोसले,गोविंद शिनगारे,अर्षद शेख, मनोराम पवार,दिनकर राऊत,शरद लोंढे, श्रीराम तांदळे,बाळासाहेब ठोंबरे,अंकुश जोगदंड यांची उपस्थिती होती.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव व पदाधिकाऱ्यां सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS