राम दातीर
माहूर(प्रतिनिधी..) आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दिलेली प्रेमळ वागणूक,प्रत्येकाला समजून घेवून केलेला न्याय निवाडा आणि एकमेकां पासून दूर गेलेल्या जोडप्याची नाराजी दूर करून सुखी केलेला त्यांचा संसार आदि बाबी पो.नि.लक्ष्मण राख यांच्या जमेची बाजू असल्याचे मनोगत नगराध्यक्षा शीतल जाधव यांनी व्यक्त केले.पो.नि.लक्ष्मण राख,स.पो.नि.भालचंद्र तिडके यांना दिलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थाना वरून त्या बोलत होत्या.
गेले तिन वर्षे माहूर पोलीस ठाण्याचे पो.नि.म्हणून यशस्वी कारकीर्द गाजविणारे पो.नि.राख यांची नुकतीच नांदेड येथे तर दिड वर्षाच्या काळात प्रत्येकाला सौजन्याची वागणूक देणारे स. पो. नि.भालचंद्र तिडके यांची सिंदखेड पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.याच वेळी राख यांचा पदभार स्वीकारणा-या पो.नि.नामदेव रीठे यांचे स्वागतही करण्यात आले. या कार्यक्रमाला तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले,ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान,भाजपाचे युवा नेते अॅड.रमण जायभाये,द पॉवर ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले,पं.स.चे माजी सभापती वसंत कपाटे,गोपाळराव कदम,भाजपाचे शहराध्यक्ष सागर महामुने,शिवसेनेचे शहर प्रमुख निलधारी जाधव,सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर महंमद, पद्माताई गिर्हे,सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार राठोड, सोनू उपाख्य आशीष चारभाई,अविनाश टनमने,इलियास बावाणी,रामेश्वर मुसळे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी नंदू संतान,विजय आमले,रहेमतअली,जयकुमार अडकिने,मनोज कीर्तने,अविनाश टनमने,पद्मजा गी-हे, मेघराज जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,तहसीलदार वरणगांवकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.शहर वासियांच्या वतीने तिन्ही सत्कार मूर्तिचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गणेश चव्हाण,राम दातीर,पवन कोंडे,जयंत गी-हे,राज ठाकूर,गजानन भारती,फिरोज पठान,प्रदीप जमदाडे,आनंदा हिंगाडे यांचेसह संजय बनसोडे,मुजीब फारुखी,प्रमोद सोनकर,वैभव लाड,विशाल चिरडे,शे.मोहसीन,योगेश दूधे,विनोद सूर्यवंशी,गजानन चव्हाण,राज पाटील कदम,अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक शिवसेनेचे जीतु चोले यांनी तर आभार प्रदर्शन स.पो.नि.अण्णासाहेब पवार यांनी केले.माहूर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.विष्णू मुटकुळे यांनी तिघांचा सत्कार करून दिलेली सलामी या कार्यक्रमाचे खास वैशिट्य ठरले.


COMMENTS