केज / प्रतिनिधी :-
केज- कळंब रोडवर केज पासून दोन किमी अंतरावर दोन मोटारसायकली व ट्रॅक्टर यांचा तिहेरी अपघात होऊन त्यात दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वा. केज-कळंब रोडवर नवीन पेट्रोल पंपाजवळ होंडा शाईन मोटार सायकल (क्र.
एमएच २३/एचके७८८९) आणि बजाज डिस्कव्हर (एमएच ४४/एन५१४६) यांची समोरा समोर धडक झाली. त्या नंतर त्यांचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला (ट्रॉली नं. एमएच ३३/४८६३) एकजण धडकला आणि ट्रॅक्टरला धडकला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर देखील रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाले. या अपघातात बंडू जाधव वय ४९ वर्ष रा. शेलगाव गांजी ता. केज आणि गणेश बंडू खरमाटे वय ४० वर्ष रा. भोई गल्ली कळंब हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. बंडू जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तर गणेश खरमाटे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती रस्त्याने पायी फिरणारे इंदानी यांनी पोलीस व रुग्णवाहिका यांना कळविले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, शिवाजी शिनगारे, अमोल गायकवाड, जिवन करवंदे, अशोक गवळी, अनिस शेख, हनुमंत चादर, राहुल नाडागुडे, चालक हनुमंत गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविले आहे.
चौकट :-
पुन्हा १०८ लवकर पोहोचली नाही ! :- अपघातातील जखमींना तात्काळ उपचार करता येण्यासाठी १०८ या रुग्णवाहिकेस संपर्क केला. मात्र रुग्णवाहिका येण्यास विलंब लागत असल्यामुळे रमेश तात्या गालफाडे मित्र मंडळाची रुग्ण वाहिका बोलावून त्यातून एका जखमीस रुग्णालयात नेण्यात आले.

COMMENTS