नांदेड जिल्ह्याच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी डॉ.भास्कर भोसले यांची सर्वानुमते निवड
नांदेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नांदेड जिल्हा व जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय कार्यकारिणी बरखास्त केल्याची घोषणा मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये केली. यावेळी सर्वांनुमते दैनिक सकाळ, दैनिक लोकमत या वृत्त समुहात दीर्घकाळ काम केलेले डॉ.भास्कर भोसले यांची नूतन जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आले या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नांदेड येथे मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी शासकीय विश्राम गृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजयजी भोकरे,प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे साहेब यांच्या मान्यतेने नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार डाॅ.भास्कर प्रभाकर भोसले,यांची सर्वानुमते नुतन जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी मुक्तेश्वर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रदीप लोखंडे, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी लोहा येथील सुरेश महाबळे आणि जिल्हा संघटक पदी धर्माबाद येथील अशोक पडोळे यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या या निवडीने नांदेड जिल्हा स्तरावर पत्रकार संघाच्या संघटन बांधणी मध्ये क्रियाशील पत्रकारांची निश्चितपणे भर पडणार आहे. या निवडीबद्दल पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी व विभागीय संघटक संतोष स्वामी यांनी अभिनंदन केले असुन पुढील कार्यासाठी सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.

COMMENTS