ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या वतीने रस्ते करा:-रामेश्वर मोकाशे*

*कान्हेगाव-शिर्शी-शिरोरी-खडका या रस्त्यासाठी घेतला ग्रामपंचायतने ठराव*

सोनपेठ/प्रतिनिधी

सोनपेठ तालुक्यात ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या शिर्शी-शिरोरी-कान्हेगाव-खडका हा रस्ता तात्काळ करून देण्याची मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे.यात त्यांनी सदर रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेले असल्याने या कामाची पूर्वीची एजन्सी परळी येथील साईनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध तक्रार करण्यात आल्यानंतर सदरचे काम साईनाथ कंस्ट्रक्शन कंपनीकडून काढून घेण्यात आले असून या कामाची नव्याने निविदा काढण्याची मागणी व तात्काळ काम सुरू करण्याची मागणी मोकाशे यांनी ग्रामपंचायत ठरावाच्या माध्यमातून केली आहे.सोनपेठ तालुक्यातील दळणवळणाच्या सोयीसुविधासाठी अंतर्गत रस्ते करण्यात यावेत ही आग्रही मागणी त्यांनी यावेळी ठरावातुन केली आहे यात त्यांनी शिवसेनेच्या तत्कालीन आमदार मीरा रेंगे यांच्या माध्यमातूनही या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांना चांगले रस्ते नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.यात कान्हेगाव,शिरोरी,शिर्शी,गारगोटी तांडा,यासह आदी गावांचा समावेश आहे.यामुळे मुख्य रस्ता करुनही मुख्य रस्त्यापर्यंत येता येत नाही हा मुख्य प्रश्न ग्रामीण भागात निर्माण होत असल्यानेच तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते निर्मिती करत ग्रामीण रस्ते विकास विभागाच्या वतीने बंद असलेले कामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी मोठ्या संख्येने या मागणीस आग्रही पाठिंबा दर्शवण्यात आला.

टिप्पण्या