__________________श्री सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने शुक्रवार दि. २६ फेब्रुवारी २०२१ सकाळी १० वा. स्वा. विनायक दामोदर सावरकर आत्मर्पण दीन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कराड यांनी स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. विनायक देशमुख यांनी सावरकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर भाष्य केले.
स्वा. सावरकर यांनी मांडलेल्या सती बंदीचा उल्लेख मांडला. तसेच सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. हिंदु समाजाच्या या अध पतणाला जाती व्यवस्था जबाबदार आसल्याचे मत मांडले. सावरकरांचा विशेष गुण हा की, ते विचार मांडून थांबले नाहीत तर ते विचार आयुष्यात कृतीत आणले. डॉ. विनायक देशमुख यांनी सावरकर यांच्या जीवनातील मृत्यु पत्राचा उल्लेख केला. त्यांनी आंतरजातीय विवाहाला समर्थनच दिले नाही तर आंतरजातीय विवाह लावून दिले. स्वा. सावरकरांचे विज्ञान विषयक विचार किती महत्त्वाचे आहेत हे विविध उदाहरणातून सांगितले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा.डॉ. केदारनाथ मालु, प्रा. रमेश गटकळ, प्रा. डॉ. शिवशंकर मिटकरी, प्रा. अशोक होके, प्रा. डॉ. गंगाधर उषमवार, प्रा. डॉ. गोरखनाथ फसले, प्रा.डॉ. तात्याराम सोंडगे, प्रा. जिजाराम बागल, प्रा. डॉ. उमेश साडेगावकर, अन्य प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

COMMENTS