छत्रपती कारखान्याच्या ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग - व्हा. चेअरमन मोहन जगताप

माजलगाव, दि.26 : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दि.1  जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ऊ...


माजलगाव, दि.26 : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दि.1  जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ऊस बिलाचा पहिला हप्ता बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. यात 930 शेतकऱ्यांच्या खात्यात 12 कोटी 42 लाख वर्ग करण्यात आले असून शेतकर्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन, कारखान्याचे व्हाईस चेअरमन व जगताप यांनी दिली आहे.

           प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 मध्ये आज अखेर एकूण गाळप 2 लाख 51 हजार 449.111 मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच कारखान्याने दि.25 ऑक्टोंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 1900 रु.प्रति टना प्रमाणे या अगोदर शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत.  माजलगाव तालुक्यातील  तसेच कार्यक्षेत्रातील  इतर कारखान्यापेक्षा  गाळप क्षमता व विविध पदार्थाचे कोणतेही प्रकल्प नसताना  माजी आमदार तथा चेअरमन श्री बाजीराव सोनाजीराव जगताप यांनी  शेतकऱ्यांचे हित जपत ऊस बिलाचा पहिला हप्ता काढला आहे. तसेच कारखान्याचे दि.1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान 65 हजार 390.554 मे. टन उसाचे गाळप झालेले असून यामध्ये एकूण 930 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचा पहिला हप्ता 1900 रू. प्रति मे.टना प्रमाणे एकूण रु.12 कोटी 42 लाख 42 हजार 228 रुपये बँकेत वर्ग केले  आहेत. उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाच्या राक्कमेचे टप्या- टप्प्याने लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक महेश सगरे, सचिव चंद्रकुमार शेंडगे उपस्थित होते. तरी सर्व शेतकऱ्यांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित बँकेत बिल जमा करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group