नायगांव प्रतिनिधी.( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील बिनविरोधपणे निघालेली कुंटूर ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सदस्या सौ. राधाबाई भोसले यांचे प्रतिनिधी नागोराव पा. भोसले यांनी गाव विकासासाठी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असून गाव विकासाच्या मागण्या संदर्भात लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले.
कुंटुर ग्रामपंचायत तेरा सदस्यांची असल्याने गावात विविध गटात पॅनल करून अटीतटीची निवडणूक लढविण्यापेक्षा कुंटूर नगरीचे माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, बाबुराव पाटील आडकिने, नागोराव पा. भोसले यांनी एकत्र येऊन गाव बिनविरोधपणे काढून गावाचा मोठेपणा ठेवला असून याला ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दर्शविला असल्याने गावांनी आपल्यावर मोठा विश्वास दाखविला या भावनेपोटी सौ. राधाबाई भोसले यांचे प्रतिनिधी तथा काँग्रेस पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते नागोराव पा. भोसले यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे गावात सार्वजनिक समशानभूमी,सि.सी रस्ता, बस स्टॅन्ड, सार्वजनिक शौचालय व गंगनबीड फाटा हायवे ते कुंटूर मार्ग दुगाव पर्यंत डांबरीकरण रस्ता या मागण्यासाठी निवेदन दिले असून या मागणीला लवकरच मंजुरी मिळेल असेही पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे याबाबत ग्रामस्थांनी भोसले यांच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत गाव बिनविरोध काढल्यामुळे गाव विकासाला निश्चितच भर पडेल तर सदर गावचे सरपंच पद ओपन राखीव असल्याने सरपंच पदाचे दावेदार सौ. राधाबाई भोसलेच असणार असेही कुंटूर गावात चर्चेला उधाण आले आहे.

COMMENTS