मुंबई दि.२४ :कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू होते.अनलॉक मधून अनेक कारखाने सुरू झाले. पण ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाहीत.तेथे आता पगारवाढ मागणे तर राहिले दूर! पण तेथे जॉब टिकविणे कठीण होऊन बसले आहे.
मात्र रायगड जिल्ह्यातील खालापूर मधील 'टाटा स्टिल बीएसएल लिमिटेड ' ही इंजिनिअरिंग कंपनी या सर्वाला आपवाद ठरली आहे!या कंपनीत सुमारे ९०० कामगार काम करतात.माजीराज्यमंत्री सचिन अहिर नेतृत्व करीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने या कामगारांच्या भरीव पगारवाढीचा करार घडवून जणू इतिहास रचला आहे!
हा पगार वाढीचा करार नुकताच आरएमएमएस-परेल येथे व्यवस्थापन आणि युनियन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चेअंती घडला आहे.
सरकारने अनलॉक सुरू केले.परंतु त्याचा पुरेपूर फायदा कामगारांनी उत्पादनक्षमता वाढवून उठवावा,असे आवाहन युनियनने केले होते.या चांगल्या कामाचे रूपांतर भरीव पगार वाढीत झालेले दिसते!
पगार वाढीच्या करारातून कामगारांना तीन वर्षांसाठी८००० रुपये पगारवाढ मिळाली आहे.ही पगारवाढ दि.१ एप्रिल २०२१ पासून लागू होणार असली तरी दि.१ जानेवारी२०२० पासून ३१ मार्च २०२१ पर्यंतची थकबाकीपोटी एकूण ३० हजार रुपये कामगारांना एक रकमी मिळणार आहेत.
तीन वर्षाच्या एकूण ८००० रु.पगारवाढी मधील पहिल्यावर्षी ६० टक्के, दुसऱ्या वर्षी २०टक्के तर तिसऱ्या वर्षी २०टक्के अशी तीन टप्प्यात ही पगारवाढ मिळणार आहे.त्या मध्ये प्रा.फंड आणि इएसआय.अंतर्भूत आहे. शिवाय वर्षाला सव्वा आठ टक्के कायद्या प्रमाणे बोनस मिळणार आहेत.एकूण सर्व १५ दिवसाच्या रजा,सुरक्षा उपकरण,उपहारगृह सवलत,कंपनी
गणवेश आदीचा लाभही या नव्या पगारवाढीच्या करातून कामगारांना मिळणार आहे.सणासाठी कामगारांना ५००० रुपये अँडव्हॉन्स मिळणार आहे. तो पुढे दोन महिन्यात कापून घेतला जाईल.
या पगार वाढीच्या करारात संजय कदम आणि संतोष बैलमा रे या युनियन पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न विशेष महत्त्वपूर्ण ठरले.
करारावर युनियनच्या वतीने अध्यक्ष सचिनअहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष संजय कदम,संतोष बैलमारे यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने सर्वश्री कपिल मोदी,निखिल कुजुर, सुब्रत ओझा या वरिष्ठांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.करार दि.१ एप्रिल२०२१ पासून ३१मार्च २०२४ पर्यंत लागू रहाणार आहे .या पगार वाढीचे कामगारांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.आजच्या घडीला लॉकडाऊन नंतरची "आदर्श पगार वाढ " अशीच नोंद कामगार चळवळ घेईल!◆◆◆◆काशिनाथ माटल◆◆◆

COMMENTS