नांदेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील ग्राम पंचायत कार्यालयात दि. 23 रोजी मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस न...
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील ग्राम पंचायत कार्यालयात दि. 23 रोजी मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे साहेब यांचा नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बाऱ्हाळी बीट जमादार पठाण साहेब, आंबुलगा येथील पोलीस पाटील विठ्ठलराव कौरवाड साहेब, सरपंच प्रतिनिधी हुल्लाजी रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य माधव मामीलवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी निलेश नागमवाड, श्रावण कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता पाटील कदम, माधव कांबळे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती,

COMMENTS