धनगर आरक्षणाच्या लढायचं युवकांनी खांदेकरी व्हावं -सखाराम बोबडे पडेगावकर

प्रतिनिधी

 धनगर समाजाच्या जिव्हाळ्याची एसटी आरक्षणाची लढाई नेतृत्वाअभावी थांबते कि काय अशी भीती  न बाळगता प्रत्येक युवकाने या आरक्षण अंमलबजावणी चळवळीचं खांदेकरी व्हावं असं मत धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभेचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी व्यक्त केलं

 ते धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने आयोजित संवाद अभियानात औंढा नागनाथ येथे बोलत होते. पुढे बोलताना बोबडे म्हणाले की धनगर आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे ते कार्यकर्ते ,नेते या लढाईपासून स्वतःला दूर ठेवत आहेत। स्वतःला मोठे समजणाऱ्या नेत्यांच्या भरोशावर न बसता तळागाळातील सर्वसामान्य युवकांनी धनगर आरक्षण अंमलबजावणी ची लढाई खांद्यावर घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तो पर्यंत प्रत्येक युवक-युवती स्वतः ला आरक्षण चळवळीचा नेता समजून या लढाईत उतरणार नाही तोपर्यंत सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेलं एसटी आरक्षण अंमलबजावणीचा स्वप्न पूर्ण होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी धनगर समाज सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हरकळ ,विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष गजानन श्रावने, एकनाथ जावडे आदींची उपस्थिती होती. औंढा नागनाथ तालुक्याचे धनगर साम्राज्य सेनेचे तालुकाप्रमुख एकनाथ आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली औंढानागनाथ याठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा, येळी, औंढा तालुक्यातील पोटा याठिकाणीही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. यावेळी एकनाथ आव्हाड, उत्तम आव्हाड , निवृत्ती आव्हाड मारोती आव्हाड ,नवनाथ आव्हाड, अंकुश आव्हाड, संतोष आव्हाड ,मारोती आव्हाड, शिवाजी आव्हाड ,तुकाराम आव्हाड, अनिकेत आव्हाड, विष्णु आव्हाड, प्रकाश आव्हाड ,वैभवआव्हाड, श्याम आव्हाड ,राजु आव्हाड, बाळूआव्हाड ,गणेश आव्हाड, सचिन वाघमोडे ,देवराव मिरसे उपस्थित होते

टिप्पण्या