नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील बिरसा मुंडा सभागृह विकसित करून आपल्या माध्यमातुन शक्य त्या योजनेतून निधी उपलब्ध करून देऊन आंबुलगा येथील बिरसा मुंडा सभागृह विकसित करावा या संदर्भात अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटन पुणे शाखा आंबुलगा (बु) यांच्या वतीने नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर मॅडम यांना दि. 23 रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी ज्या माध्यमातून, योजनेतून बिरसा मुंडा सभागृहाला विकास निधी उपलब्ध करून देता येईल त्या माध्यमातून विकास निधी देऊन बिरसा मुंडा सभागृह पूर्ण करू असे आश्वासन दिले.यावेळी मन्नेरवारलू संघटनेचे मार्गदर्शक व्यंकटराव कल्याणपाड, सुधाकरराव मामीलवाड, युवा पत्रकार विठ्ठल कल्याणपाड, ग्रामपंचायत सदस्य माधव मामीलवाड, मन्नेरवारलू समाज आंबुलगा संघटनेचे सचिव दिगांबर अन्नमवाड आदी जणांची उपस्थिती होती.

COMMENTS