नांदेड -
• श्रमसंहिता रद्द करा, कृषी कायदे मागे घ्या, वीज दुरुस्ती विधेयक २०२० मागे घ्या व रेल्वे व अन्य सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवा तसेच गरीब कुटुंबांना उत्पन्न-अन्न सहाय्य द्या या मागण्यांसाठी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी देशव्यापी विरोध दिवस. आंदोलनात जनविरोधी बजेटच्या विरोधात आवाज उठवला जाईल. सर्व कामांच्या ठिकाणी श्रमसंहिता आणि कृषी कायद्यांची होळी केली जाईल.
• सर्व क्षेत्रातील कामगारांमध्ये श्रमसंहितांच्या घातक परिणामा बाबत व्यापक मोहिम राबविण्यात येईल.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात जिल्हा पातळीवर तीन दिवाशीय अखंड संयुक्त धरणे आंदोलन करण्यात येईल.
संयुक्त कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी "सीटू कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने
राष्ट्रीय आवाहना नुसार नांदेड शहरात दि. 3 फेब्रुवारी २०२१ बुधवार रोजी संध्याकाळी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर कामगार संहिता/शेतकरी विरोधी कायद्याची होळी करण्यात आली व निदर्शने करून देशव्यापी विरोध दिवस पाळण्यात आला. स्थानिक व आशांच्या मागण्या घेऊन मनपा आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला.उपायुक्त बाबूराव बिकड यांच्या मध्यस्थीने दोन दिवसांत मिटिंग लावण्याच्या अटीवर आंदोलनाची सांगता झाली.
नंतर सीटूचे शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालया समोर जमून निदर्शने करीत कामगार विरोधी विधेयकाची होकरण्यात आली. आंदोलनात कॉ.उज्वला पडलवार,कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.रेखा धूतडे,कॉ. शेख मगदूम पाशा, कॉ.विक्की गवई,कॉ.सुनिल गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड यांनी नेतृत्व केले तर सामाजिक कार्यकर्ते सोपान नेवल पाटील यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.
-- आपला
कॉ.गंगाधर गायकवाड
सेक्रेटरी - आशा व गट प्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा (संलग्न सीटू.)
मो.7709217188.
दिनांक 3/2/2021.

COMMENTS