राम दातीर माहूर (प्रतिनिधी.) माहुर न्यायालय परिसरात सोमवारच्या रात्रीला लागलेली भिषण आग न.पं.च्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घेतलेल्...
राम दातीर
माहूर (प्रतिनिधी.) माहुर न्यायालय परिसरात सोमवारच्या रात्रीला लागलेली भिषण आग न.पं.च्या अग्निशमन विभागाच्या पथकाने घेतलेल्या परिश्रमाने लवकरच क्षमली.
न्यायालया लगतच्या भागात लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते.आग न्यायालयाच्या भिंती पर्यंत येऊन भीडली होती. मुख्याधिकारी विद्या कदम यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्निशमन वाहनासह दल घटनास्थळी रवाना केले. जोराचा वारा सुटल्याने भीषण रूप धारण केलेल्या आगीत अनेक झाड़ी-झुडपे जळून खाक झाले होते. सुमारे दिड तास अथक परिश्रम घेवून अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. नगरसेवक इलियास बावाणी ,कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी, सुनिल वाघ यांच्या मार्गदर्शनात गणेश जाधव,ज्योतिबा खडसे,अविनाश रुनवाल,प्रविण शेंडे आदिंच्या प्रयत्नाने लागलेली आग आटोक्यात आली.

COMMENTS